डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तसंच राज्यातल्या जनतेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.
गेल्या अनेक दशकांची महाराष्ट्राची ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं असून त्याबद्दल सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केलं आहे. तसंच केंद्रसरकारचे आभार मानले आहेत.
याखेरीज विविध राजकीय पक्ष, भाषाक्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, संस्था आणि साहित्य वर्तुळातल्या अनेक मान्यवरांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा