महिला क्रिकेटमधे १९ वर्षांखालील ट्वेंटी- ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून मलेशिया इथं सुरूवात होत आहे. यामध्ये १९ संघ सहभागी होत आहेत. या संघाची चार गटात विभागणी केली असून, भारताच्या गटात मलेशिया, श्रीलंका, वेस्टइंडिज हे संघ आहेत. भारताचा पहिला गटसाखळी सामना उद्या वेस्टइंडिजबरोबर होणार आहे. आज सहा साखळी सामने होणार आहेत.
Site Admin | January 18, 2025 2:49 PM | T20