विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत हरियाणा, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्र या राज्यांचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये हरियाणाने गुजरातच्या संघाचा २ गडी राखून पराभव केला तर विदर्भ संघाने राजस्थानच्या संघाचा ९ गडी राखून पराभव केला. उद्या आणि परवा उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार असून १८ जानेवारीला वडोदरा इथे स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
Site Admin | January 13, 2025 2:26 PM | Vijay Hazare Cricket Trophy