मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासोबतच मिळणारे इतर लाभ देण्याची विनंती राज्य सरकारनं आज केंद्राला केली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. त्यावेळी यासंदर्भात ४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्राची प्रत शेखावत यांनी सामंत यांना सुपुर्द केली.
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बांग्ला या भाषांना अभिजात दर्जा दिल्याचा उल्लेख त्यात आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव २-३ आठवड्यात सादर करुन असं सामंत म्हणाले. महाराष्ट्रासह इतर राज्यात तसंच विदेशातही मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.