‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून त्याची सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. त्यांनी मुंबईत असल्फा इथल्या हनुमान टेकडी परिसरात भेट देऊन तिथं सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. दरड प्रवण क्षेत्राला सुरक्षा जाळ्या बसवून पावसाळ्यात दरडी कोसळून होणारं नुकसान टाळलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
धोकादायक ठिकाणच्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. धोकादायक इमारती, एसआरए, झोपडपट्टी पुनर्वसनाची जी कामं रखडली आहेत, ती सरकारच्या विविध यंत्रणा ताब्यात घेतील आणि मुंबईकरांना हक्काचं घर मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.