डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र सरकार नव्या पर्यटन धोरणाद्वारे १८ लाख रोजगार निर्मिती करणार

राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचं पर्यटन धोरण – २०२४ तयार करण्यात आलं असून याद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १८ लाख रोजगार निर्मिती करणार आहे, अशी  माहिती पर्यटन यांनी काल दिली. दहा वर्षात पर्यटन स्थळं तसंच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असल्याचं महाजन यांनी सांगितलं. 

 

या पर्यटन धोरणानुसार, पर्यटन घटकांना भांडवली गुंतवणूकीसाठी  प्रोत्साहन, सीजीएसटी कराचा परतावा, वीजदरात सवलत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना इतर वित्तीय प्रोत्साहन, व्याज आणि अनुदान प्रोत्साहन तसंच महिला उद्योजक, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांगांना  अतिरिक्त प्रोत्साहन दिलं जाईल. ग्रामीण आणि शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

 

राज्यात उच्चतम दर्जाचं शाश्वत आणि जबाबदार पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने विविध पुरस्कारही देण्याचा निर्णय सरकारनं  घेतला आहे. राज्यातल्या लघु, मध्यम, मेगा, अल्ट्रा मेगा प्रकल्पांना अ, ब आणि क, गटांमध्ये विभागलं असून त्यांना गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या आधारे प्रोत्साहन दिलं जाणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन नवकल्पना, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यावर या धोरणात भर देण्यात येईल आणि राज्यातल्या एक खिडकी प्रणालीला केंद्र शासनाच्या मैत्री प्रणालीसह संलग्न केलं जाईल, अशी माहिती महाजन यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा