राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार आहे. यासंदर्भातल्या विविध प्रणालींमधला डेटा टाटा कम्युनिकेशन्सकडून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे हस्तांतरित केला जातोय. त्यासाठी पुढच्या आठवड्यात या प्रणाली बंद राहणार असल्यानं लवकर वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जिल्हापरिषद, विद्यापीठ, विविध शैक्षणिक संस्था यातल्या कर्मचाऱ्यांनाही यंदा लवकर वेतन मिळेल.
Site Admin | October 24, 2024 7:17 PM | Maharashtra
राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार
