प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्ट अप इंडिया या योजनेला आज ९ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर विशेष संदेश लिहिला आहे. सरकारने देशात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सरकारच्या गेल्या नऊ वर्षांतल्या धोरणांमुळे असंख्य तरुणांना सक्षम केलं असून त्यांच्या कल्पनांना वास्तवात आणलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
Site Admin | January 16, 2025 2:21 PM | Prime Minister | Start Up India scheme