देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे, अस लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज असून सीमाभागात पायाभूत सुविधा मजबूत करणं हे भारतीय लष्कराचं उद्दिष्ट आहे, असं द्विवेदी म्हणाले. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असून केंद्रशासित प्रदेश दहशतवादापासून मुक्त होत पर्यटन व्यवसायाकडे जात आहे. गेल्यावर्षी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी साठ टक्के पाकिस्तानी होते, असं द्विवेदी यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये हिंसक कारवायांचं प्रमाण घटलं असून इथले नागरिक शांततेच्या बाजूने आहेत, असंही ते म्हणाले.