खासदार क्रीडा महोत्सवाचा सातव्या पर्वाचं उद्घाटन आज नागपुरात यशवंत स्टेडियम इथं झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार कंगना राणावत यांनी मॅरेथॉन आणि युवा दौडला हिरवी झेंडी दाखवून खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केलं.
नागपुरात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले जात असून नागपुरमध्ये साडे तीनशे मैदानं खेळण्यासाठी तयार करायचे आहेत असं गडकरी यांनी सांगितलं. यावर्षी खासदार क्रीडा महोत्सवात ८० हजार खेळाडू सहभागी होत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.