‘बिमस्टेक’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. ही दोन दिवसीय शिखर परिषद, बिमस्टेक गटातल्या देशांमध्ये संरक्षण, कनेक्टिविटी, व्यापार, गुंतवणूक या क्षेत्रांमधल्या सहकार्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे. बंगालच्या खाडी क्षेत्रातल्या भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान या राष्ट्रांमध्ये तंत्रज्ञान आणि आर्थिक बाबतीत बहुस्तरीय सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने बिमस्टेक हा राष्ट्रगट कार्यरत आहे.
Site Admin | July 11, 2024 3:02 PM | एस. जयशंकर | ‘बिमस्टेक’