हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूह महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. क्वाडच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. तात्कालिक आपत्तीला प्रतिसाद देण्यातून निर्माण झालेला क्वाड समूह आता पूर्णवेळ भागीदारीत परिवर्तित झाला असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. क्वाड समूह आता एकमेकांसोबतच हिंद प्रशांत क्षेत्रातल्या इतर देशांबरोबरही सहकार्य करत आहेत. हवामान बदल, कर्करोग आणि साथरोग ते दर्जेदार पायाभूत सुविधा, दहशतवादविरोधी लढा आणि सायबर सुरक्षा अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी क्वाड समूह एकत्र काम करत आहे.