डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

यंदाचा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु ल देशपांडे कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या, यंदाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत, परभणी इथल्या भारत माता गणेश मंडळाला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. द्वितीय पुरस्कार ठाणे इथल्या जय भवानी मित्र मंडळ आणि तृतीय पुरस्कार लातुरच्या वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव यांना जाहीर झाला आहे. याशिवाय ३३ जिल्हास्तरीय पारितोषिक विजेत्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाला जिल्हास्तरीय पारितोषिक जाहीर झालं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा