भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची गेले तीन दिवस सुरू असलेल्या बैठकीचा आज समारोप होत आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा गेल्या दोन दिवसांत घेतल्या गेलेल्या निर्णयांची घोषणा करतील आणि मग बैठकीचा समारोप होईल. रेपो दराव्यतिरिक्त भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज, चलनवाढीची स्थिती, ग्राहक मूल्य निर्देशांकातील चलनवाढ आणि सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज याविषयी मल्होत्रा प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरू झाली होती. गव्हर्नर यांच्या बैठकीचं थेट प्रक्षेपण बँकेच्या यूट्यूब वाहिनीवर पाहाता येणार आहे. व्यवसायिक बँकाना होणाऱ्या मिळणाऱ्या अल्पकालीन निधीवर रेपो दराचा परिणाम होत असल्यानं या संदर्भातल्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष असेल.
Site Admin | April 9, 2025 9:47 AM | Monetary Policy Committee | Reserve Bank of India
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज समारोप
