देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास ५ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. हे प्रमाण २०११-२०१२ या आर्थिक वर्षात जवळपास २७ टक्के इतकं होतं. भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये शहरी भागातलं दारिद्र्याचं प्रमाणही १३ पूर्णांक ७ शतांश टक्क्यांवरून ४ पूर्णांक ९ शतांश टक्क्यांवर आलं आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तीत झालेली वाढ आणि सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे ग्रामीण भागातल्या दारिद्र्याच्या प्रमाणात ही मोठी घट झाल्याचं अहवालातून दिसून आलं आहे.
Site Admin | January 4, 2025 1:40 PM | country | financial year 2023-24. | State Bank of India
देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३ – २४ या आर्थिक वर्षात ५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात निष्कर्ष
