डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात

 
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे. 
 
 
 
वाशिम जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देण्यात आली. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी जाहिरात फलक हटवावेत तसंच नियमांचं काटोकोर पालन करावं  असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले. 
 
 
 
अकोला जिल्ह्यात निवडणूक मुक्त वातावरणात व्हावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी पथकं, चेकपोस्ट ठेवण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करायलाही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
 
 
 
नंदुरबार जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार आढळून आल्यास योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधिकाऱ्यांनी दिला. 
 
 
 
नाशिक जिल्ह्यात तसंच निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी वार्ताहर परिषदेत दिली. तसंच राजकीय पक्षांना फलक हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
 
 
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात ९२१ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसंच निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा