राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्वप्रथम चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या नवनिर्वाचित आमदारांना, तालिका अध्यक्ष म्हणून सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. इतर आमदारांच्या शपथग्रहणानंतर सभागृहाचं कालचं कामकाज तहकूब झालं. उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना आज शपथ देण्यात येईल.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड उद्या नऊ तारखेला होणार असून, यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मुदत आज दुपारी बारा वाजेपर्यंत असल्याचं, कोळंबकर यांनी सांगितलं.
Site Admin | December 8, 2024 10:06 AM | आमदार | विधानसभा | विशेष अधिवेशन | शपथग्रहण