केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या इयत्ता तिसरी आणि सहावीची, 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीची नवीन पाठ्यपुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहे. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. तिसरी आणि सहावीची नऊ पाठ्यपुस्तके यापूर्वीच उपलब्ध झाली असून आणखी 8 पाठ्यपुस्तके लवकरच बाजारात येणार आहेत.
2047 पर्यंतच्या अमृत काळाच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक निर्मिती बद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव, केंद्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि एन सी आर टीचे संचालक यांच्याशी विस्तृत चर्चा केली.