डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असून भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आपल्या लढ्यामुळंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते.

 गेल्या १० वर्षातल्या रालोआ सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत मोदी यांनी सांगितलं, देशाची अखंडता आणि एकात्मता यांच्या सुरक्षिततेसाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो याची जगाला ओळख पटली. २५ कोटी नागरिक गरीबीतून बाहेर पडले. काश्मीरमधे लष्करावर दगडफेक व्हायची.३७० कलम रद्द झाल्यावर ती थांबली.  विकासाच्या वाटेवर गेल्या १० वर्षात आता भारताची स्पर्धा स्वतःशीच आहे. असं ते म्हणाले. जनतेने कौल स्पष्टपणे रालोआच्या बाजूने दिला असूनही त्याबाबत काँग्रेस अपप्रचार करीत असून जनतेची दिशाभूल करीत आहे असा आरोप त्यांनी केला. आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान काल सभागृहात अनुचित आणि असत्य वक्तव्य झाली असा आरोप करुन त्याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी मोदी यांनी सभापतींकडे केली. देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण करण्याचं, जगात देशाची नाचक्की करण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची गंभीर दखल सरकारने घेतली असून त्याचा तपास केंद्रीय यंत्रणांमार्फत सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशाच्या विकासाकरता निकोप स्पर्धा करण्याचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात त्यांनी सुप्रशासनाचे मानदंड निर्माण करावे असं ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशात हाथरस इथं चेंगराचेंगरीत २७ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल प्रधानमंत्र्यांनी तीव्र शोक प्रकट केला. 

या संदेशाचा काळ वगळता विरोधकांनी  प्रधानमंत्र्यांचं भाषण चालू असताना सरकारविरोधी घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा