प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर चर्चेला उत्तर देतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. संध्याकाळी पाच वाजता मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरल्या चर्चेला काल संसदेच्या दोन्ही सभागृहात सुरूवात झाली.