लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षांनिमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. आज चर्चासत्राची सुरुवात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजेजू यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचं त्यांनी यावेळी कौतूक केलं. देशाने स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. अल्पसंख्याकांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही आणि त्यांना कायदेशीर संरक्षण असल्याचं रिजिजू म्हणाले. देशातील सहा अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काल या चर्चासत्रात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापले विचार मांडले.
Site Admin | December 14, 2024 2:42 PM | Prime Minister Narendra Modi