डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत आहेत. हा या कार्यक्रमाचा १११ वा, तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच भाग असेल.

रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र, एआयआर न्यूज हे संकेत स्थळ, आणि न्यूजऑनएआयआर या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. आकाशवाणी वृत्तविभाग, डीडीन्यूज, प्रधानमंत्री कार्यालय, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनल्सवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषेतला अनुवाद आकाशवाणी प्रसारित करणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा