डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 11, 2025 1:29 PM | narendra modi | PMO

printer

प्रधानमंत्री उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 3 हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम् इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.

 

विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. यावेळी तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा