जम्मू काश्मीर मधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या बोगद्यामुळे श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान बारमाही रस्ता उपलब्ध होईल. सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या सोनमर्ग बोगदा प्रकल्पासाठी २ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला असून हा बोगदा भूस्खलन आणि हिमस्खलनप्रवण रस्ते टाळून लडाखशी अखंड संपर्क निर्माण करणार आहे. यामुळे सोनमर्ग इथं हिवाळी पर्यटन, साहसी खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. तसंच श्रीनगर आणि लडाख दरम्यान प्रवासाच्या वेळात बचत होईल. प्रधानमंत्र्यांनी यावेळी बांधकामावर कार्यरत अधिकारी, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांशी संवाद साधला. उद्घाटनानंतर सोनमर्ग इथे प्रधानमंत्र्यांची जाहीर सभा होत आहे.
Site Admin | January 13, 2025 3:49 PM | Jammu and Kashmir | Prime Minister | Sonamarg Tunnel