प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये मुख्य सचिवांच्या चौथ्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. तीन दिवस होणाऱ्या या संमेलनाला प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सुरुवात झाली. राज्यांच्या मदतीनं साधलेल्या विकासाचं मूल्यमापन करणं आणि कार्यान्वित करणं, हा या संमेलनामागचा उद्देश आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित भागीदारीला सशक्त करणं तसंच सहकारी संघराज्यवाद, जलद आर्थिक वृद्धी आणि विकासामधे योग्य ताळमेळ हे या संमेलनातल्या चर्चेचे विषय आहेत. या संमेलनात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ सहभागी झाले आहेत.
Site Admin | December 15, 2024 1:48 PM | pm mod