प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाशिम तसंच ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात वाशिम इथं २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या तर ठाणे इथं ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या च्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता यावेळी जारी करण्यात येईल. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे एक हजार ९२० कोटी रुपयांचे प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील. पोहरादेवी इथं “बंजारा विरासत संग्रहालयाचं” उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
मुंबई मेट्रोच्या नव्या टप्प्याचं उद्घाटन, ठाणे मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी तसंच नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्राच्या विकासासाठी नैना प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नांदेड इथल्या गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर आगमन . यावेळी खासदार अशोक चव्हाण, पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केलं स्वागत.