डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघाला प्रधानमंत्र्यांची शाबासकी

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून आज बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं . केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्ली विमानतळावर विश्वविजेत्या संघाचं स्वागत केलं. मोठा जनसमुदाय विमानतळाबाहेर उपस्थित होता. वादळी हवामानामुळे संघाला बार्बाडोसमध्ये अडकून पडावं लागलं होतं. क्रिकेटपटूंचं दुपारी मुंबईत आगमन होणार असून संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर एका शोभायात्रेत सहभागी होऊन ते क्रिकेटरसिकांची मानवंदना स्वीकारतील. शोभायात्रेला ५ वाजता एन सी पी एपासून सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडिअमवर त्यांचा सत्कार होणार आहे. टीम इंडियाला बी सी सी आय कडून सव्वाशे कोटी रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.एन सी पी ए ते मेघदूत पुलापर्यंतचा मार्ग वाहनांना फिरण्यास तसंच पार्किंग करण्यास बंद राहील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा