२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं NXT परिषदेत बोलत होते. जगभरातील लोक भारताला जाणून घेण्यासाठी इथं येत आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं.
तिथल्या व्यवस्थापनाबद्दल जगाला भारताचं आश्चर्य वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. योगा आणि आयुष उत्पादनं जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून निर्यात वाढल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. भारतातल्या अनेक सेवा आणि वस्तू जगभरात जात आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले.