डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 31, 2024 10:58 AM

printer

भारताच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रामुळे जगभरातल्या लोकांची जीवनपद्धती सुलभ होणार असल्याचं पंतप्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रामुळे जगभरातल्या लोकांची जीवनपद्धती सुलभ होणार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. जागतिक वित्तीय तंत्रज्ञान अर्थात फिनटेक महोत्सवात ते काल मुंबईत बोलत होते. भारतानं ज्या गतीनं आणि ज्या प्रमाणात वित्त क्षेत्रातलं तंत्रज्ञान अंगीकारलं आहे त्याला जगात तोड नाही.जगातले निम्म्यापेक्षा जास्त तत्काळ होणारे डिजिटल अर्थव्यवहार भारतात होतात असं प्रधानमंत्री म्हणाले.आर्थिक सेवांचं सार्वत्रिकीकरण होण्यात फिनटेकनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल व्यवहारांमुळे आर्थिक व्यवहारांमधली पारदर्शकता वाढली आणि समांतर अर्थव्यवस्थेला खीळ बसली. फिनटेकनं आर्थिक व्यवहारांमध्ये आणलेले बदल केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाहीत. त्यांचा सामाजिक परिणाम खूप व्यापक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. फिनटेक क्षेत्रातल्या अत्याधुनिक कल्पनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनालाही यावेळी मोदी यांनी भेट दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा