डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मालवण राजकोटमधला शिवरायांचा पुतळा पडल्याबद्दल प्रधानमंत्र्याकडून दिलगिरी व्यक्त

देशातल्या सर्व बंदरांमधून होणाऱ्या एकूण कंटेनर वाहतुकीपेक्षा अधिक कंटेनर वाहतूक या बंदरातून होईल. इथं येणाऱ्या हजारो जहाजं आणि कंटेनर मुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलून जाईल. महाराष्ट्राकडे विकासासाठी लागणारं सामर्थ्य आणि संसाधनं आहेत. महाराष्ट्राला समुद्री व्यापाराचा इतिहास आहे आणि भविष्यातही व्यापाराच्या संधी आहेत, असं ते म्हणाले.  महाराष्ट्राचा, या परिसराचा विकास होऊ नये असं वाटत असल्यानं विरोधक या बंदराला विरोध करत असल्याची टीका मोदी यांनी केली. 

 

मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याबद्दल मोदी यांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. त्यांची, तसंच या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांचीही मी क्षमा मागतो, असं प्रधानमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा