देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला आहे. या वाढीमुळे आज २४ कॅरेट सोने ८७ हजार रुपयांच्या तर २२ कॅरेट सोने देखील ८० हजार रुपयांच्या पातळीवर पोहचलं आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७ हजार २२० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९ हजार ९६० रुपये इतका आहे. मुंबईच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७ हजार ७० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९ हजार ८१० रुपये इतका आहे.
चांदीच्या किमतीत मात्र आज किंचित घट झाली. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीची किंमत प्रति किलो ९९ हजार ४०० रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे.
Site Admin | February 11, 2025 2:08 PM | सराफा बाजार | सोन्याचा दर
देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक
