रशियाच्या तुरुंगात असलेल्या युक्रेनियन कैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेले उत्तर कोरियाचे दोन जवान देण्याचा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला दिला आहे. रशियाच्या पश्चिम कुर्स्क प्रदेशातून हे दोन जवान ताब्यात घेतल्याचं झेलेन्स्की यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. या जवानांची चौकशी सुरू असल्याची चित्रफित देखील झेलेन्स्की यांनी प्रसृत केली आहे. दरम्यान, युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर कोरियाने आपले अकरा हजार सैनिक पाठवल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे. या युद्धात उत्तर कोरियाचे शंभर सैनिक मरण पावले असून एक हजार सैनिक जखमी झाल्याचंही दक्षिण कोरियानं म्हटलं आहे.