सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम १४ ते १८ जानेवारी दरम्यान भारत भेटीवर येत आहेत. सिंगापूर राष्ट्राध्यक्षाची गेल्या दहा वर्षातली ही पहिली भारत भेट असून भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही भेट आहे.
आपल्या दौऱ्यात षण्मुगरत्नम नवी दिल्ली आणि ओदिशाला भेट देतील. तसंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.