डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिव्यांग जनांना समान वागणूक देणं हे सर्वांचं कर्तव्य – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दिव्यांग जनांचा सार्वजनिक वावर सोयीचा व्हावा तसंच, त्यांना समान वागणूक दिली जावी हे सर्वांचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्या बोलत होत्या. दिव्यांगांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जगता येणं हा समाजासाठी प्राधान्यक्रम असायला हवा. ज्या समाजात दिव्यांगाना समान संधी आणि वागणूक मिळेल तोच समाज प्रगत समाज असतो. याच उद्दिष्टानं सुगम्य भारत या अभियानाची वाटचाल सुरू आहे, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. 

 

आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात  आले. यावेळी एकूण २२ व्यक्ती आणि ११ संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रियांका दाभाडे, कनिका अग्रवाल, प्रथमेश सिन्हा या तिघांचा तसंच सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा