कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेच्या आयोजकांनी हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट, स्क्वॉश आणि नेमबाजी यासारख्या अनेक प्रमुख खेळ या स्पर्धेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेत केवळ दहा खेळांचा समावेश असेल, आर्थिक आणि व्यवस्थापनातील जोखमीचं संतुलन राखण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.
23 वी राष्ट्रकुल क्रिडास्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते दोन ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहे. भारतासह 74 राष्ट्रकुल देश आणि सुमारे तीन हजार खेळाडू यात भाग घेतील.