अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांनी आज राज्यसभेतून सभात्याग केला. आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर एमएसपी, फेंजल चक्रिवादळ, संभल हिंसाचार आणि अदानी लाचखोरी प्रकरणावर विरोधी पक्षांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर काँग्रेस आणि आपच्या सदस्यांनी एमएसपी कायद्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. गेल्या आठवड्यात विरोधकांनी गोंधळ घालण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव का दिला नाही, या धनखड यांच्या प्रश्नावर काही विरोधकांनी आक्षेप घेतला. तर काँग्रेसचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी सरकारवर एमएसपी संदर्भातल्या मागण्या पूर्ण न केल्याचा आरोप करत या संबंधित कायदा करण्याची विनंती केली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष सदस्यांसह इतर सदस्यांनी सभात्याग केला.
Site Admin | December 4, 2024 3:27 PM | Rajya Sabha | सभात्याग