विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत केली. गेले अनेक दिवस विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त आहे हे संविधानाला धरून नाही असं सांगत शेकापचे जयंत पाटील यांनी आज कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील जयंत पाटील यांच्या मुद्द्याला समर्थन देत लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली. चर्चेच्या माध्यमातून सर्वसहमतीनं देखील सभापती निवडण्याची विरोधकांची तयारी आहे, असं ते म्हणाले. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यावा, सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करता येईल असं उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | June 29, 2024 7:24 PM | अंबादास दानवे | जयंत पाटील | विधानपरिषद