डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारवर टीका केली. काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शेतकरी, गरीब आणि बेरोजगारी हे मुद्दे उपस्थित केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नसून, सरकार अन्नधान्यावर पुरेसं किमान आधारभूत मूल्य देत नसल्याचं ते म्हणाले.

 

सरकारनं या अर्थसंकल्पातून समाजाच्या कोणत्याही घटकाचं समाधान केलं नसल्याची टीका ‘आप’ चे राघव चड्डा यांनी केला. सामान्य माणसावरचा कराचा बोजा वाढला असून ग्रामीण भागातली उत्पन्नाची वाढ दशकभरात सर्वात नीचांकी पातळीवर असल्याचं ते म्हणाले.

 

हा अर्थसंकल्प केवळ दोन राज्यांना खूश करणारा असून, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बीजेडीचे देबाशिष सामंतराय यांनी केला. तर हा अर्थसंकल्प गरीब विरोधी असल्याचं राजदचे संजय यादव म्हणाले.

 

तर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रासाठी पुरेशा तरतुदी केल्याचं सांगून भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. भाजपाचे बैजयंत पांडा यांनी हा अर्थसंकल्प व्यापक असून, देशाला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा