अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षानं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. मिलवॉकी इथं झालेल्या रिपब्लिकन राष्ट्रीय समिती सदस्यांच्या बैठकीत ट्रम्प यांना बहुमत मिळाल्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ट्रम्प सलग तिसऱ्या वेळा रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होणार आहे.
ओहायोचे सेनेटर जे. डी. व्हान्स आपले उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार असतील, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. व्हान्स यांची निवड करून ट्रम्प यांनी पेनसिल्व्हानिया, मिशिगन आणि व्हिस्कॉन्सिनसारख्या राज्यांवर आपला भर असल्याचं सूचित केलं आहे.दरम्यान, ट्रम्प यांनी गोपनीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप करणारं प्रकरण अमेरिकेतील एका जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावलं आहे. या प्रकरणी जॅक स्मिथ यांची विशेष वकील म्हणून नेमणूक घटनाबाह्य असल्याचा निर्वाळाही न्यायाधीश एलीन कॅनन यांनी दिला