पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्रालयानं वन्यजीव अधिवास एकीकृत विकास योजनेचं उद्दिष्ट साध्य केलं आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी अलीकडेच केंद्रीय मंत्रालयानं 2 हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या याजनेमध्ये प्रामुख्यानं वाघ प्रकल्प, हत्ती प्रकल्प आणि अन्य वन्यजीवांच्या अधिवासाचा विकास होणं अपेक्षित आहे. या योजनेमुळे 50 लाख दिवसांची रोजगार निर्मिती होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. या योजनेचा लाभ एकंदर 55 वाघ, 33 हत्ती अभयारण्य आणि 718 आरक्षित तसंच इतर क्षेत्रांना होईल.
Site Admin | September 22, 2024 11:00 AM