विधानपरिषदेच्या नियमित सत्रात आज सभागृहाच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आमदारकीची शपथ दिली.
राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातील अन्य विषयांबाबत शिफारसी करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल येत्या २५ तारखेला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
Site Admin | July 9, 2024 2:46 PM | आमदार शपथविधी | विधानपरिषद
विधानपरिषदेत झाला सभागृहाच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी
