राष्ट्रीय शेअर बाजारातल्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या नोंदणीत ३ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकी वाढ झाली आहे. १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना झाल्यापासून पुढची १४ वर्षं १ कोटी इतके गुंतवणूकदार होते. त्यानंतर मात्र हा वेग वाढला. गेल्या पाच महिन्यांत १ कोटी नव्या गुंतवणूकदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
Site Admin | January 22, 2025 1:47 PM | नोंदणीकृत गुंतवणूकदार | राष्ट्रीय शेअर बाजार