देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ८८ कोटींवरुन ९५ कोटी ४० लाखांवर गेली आहे. तर ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ९२ कोटी ४० लाख झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ७ कोटी ३० लाख आणि ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत ७ कोटी ७० लाखांनी वाढ झाल्याची माहिती दूरसंवाद मंत्रालयानं दिली आहे. देशातल्या दूरध्वनी वापरकर्त्यांमध्येही ३ कोटींची वाढ झाली असून ही संख्या १२० कोटींवर गेल्याचं भारतीय दूरसंवाद प्राधिकरणाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
Site Admin | August 21, 2024 1:33 PM | Internet | Telephone