भारत आणि इराण दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या एकोणिसाव्या परराष्ट्र व्यवहार विषयक सल्लागार बैठकीत दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांना उजाळा देण्यात आला. यावेळी चाबहार बंदर, कृषी सहकार्य, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रासह इतर अनेक मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. याशिवाय अफगाणिस्तान आणि पश्चिम आशिया मधल्या घडामोडींसह इतर प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा झाली. या बैठकीला परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री माजिद तख्त रावंची उपस्थित होते. दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य परिषदेत सहकार्य करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला.
Site Admin | January 4, 2025 2:34 PM | Foreign Affairs