येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तिकर विधेयक आणण्यात येणार आहे, त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं.
दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आर्थिक विकासाकरता आणि महागाईच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्र मिळून काम करत आहेत, असं सीतारामन यांनी सांगितलं.