महाराष्ट्रात पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा आढावा घेण्याच्या सूचनाही श्रम आणि रोजगार मंत्रालयाला केल्या आहेत.