दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी मंगळवारी देशात मार्शल लॉ घोषित केल्यानंतर त्यांच्याविरुद्धच्या महाभियोगावर आज नॅशनल असेंब्लीत मतदान होणार आहे. यून यांनी राजकीय पक्ष आणि माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशानं मार्शल लॉ घोषित केला होता, मात्र कायदेमंडळाच्या १९० सदस्यांच्या नकारानंतर सहा तासांत त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यांच्यावरचा महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी कायदेमंडळात दोन तृतीयांश बहुमत आणि त्यानंतर राज्यघटनात्मक न्यायालयाचं शिक्कामोर्तब गरजेचं आहे. दरम्यान, यून सुक येओल यांनी या निर्णयाबद्दल देशाची माफी मागितली आहे.