आगामी विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ८५ वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणेनं विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये व्हीलचेअर, व्हॅन, ईको व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, टॅक्सी, तसंच मतदान केंद्रांत जिन्यांवर चढण्यासाठी सरकत्या व्हीलचेअर यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या मोफत सुविधा मिळवण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी सक्षम ॲपद्वारे आवश्यक मागणी नोंदवावी, असं आवाहन जिल्हाधिकारी तसंच अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केलं आहे.
दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी दिव्यांग मित्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी मुंबईतल्या १० विधानसभा मतदारसंघात मोफत बस सुविधा उपलब्ध असेल.
अंध मतदारांना मतदान प्रक्रियेत कोणाच्याही मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हं असलेली ईव्हीएम देखील उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अंध मतदारांना ब्रेल लिपीतल्या मतदार स्लिप वाटण्यात येत आहेत.
Site Admin | November 13, 2024 2:19 PM | मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणा | विधानसभा निवडणुक