डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन उद्या नवी दिल्लीत साजरा करणार

शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन उद्या नवी दिल्लीतल्या माणेकशॉ सेंटर सभागृहात  अखिल भारतीय शिक्षा समागम ABSS, २०२४ या संकल्पनेत  साजरा करणार आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध भागधारकांच्या वचनबद्धतेला पुनरुज्जीवित करण्यासाठी अखिल भारतीय शिक्षा समागमची संकल्पना मांडण्यात आली आहे. 

या निमित्तानं, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी दरम्यानचे अनुभव  सांगतील. विविध भारतीय भाषा शिकणं सुलभ करण्यासाठी  टीव्ही वाहिन्यांसह शिक्षण विभागाच्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटनही करतील.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा