डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार

 

ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियातल्या कझान इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरल्या गस्तीच्या व्यवस्थेसंबंधी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात औपचारिक बैठक झाली नव्हती.

 

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरच्या गस्तीसंबंधाने झालेल्या करारानंतर या देशांमधले संबंध सामान्य होतील अशी आशा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. गुटेरेस ब्रिक्स परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स सत्रालाही संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्र्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसौद पेजेश्कियान यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. रशिया- युक्रेन तसंच पश्चिमआशियात सुरु असलेल्या संघर्षांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढला जावा, असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. तसंच यात भारत सहकार्य करेल असं आश्वासन दिलं. हा संघर्ष निवळण्यासाठी संवादाची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा